घरमहाराष्ट्र'मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का?'

‘मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का?’

Subscribe

बुलंदशहर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 'गोहत्येचे ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का?', असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उत्तर प्रदेच्या बुलंदशहर जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकारी आणि एक तरुण यांचा जीव गेला. हा हिंसाचार गो हत्येच्या संशयावरुन उसळला होता. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘गोहत्येचे ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का?’, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीचे उदाहरण दिले आहे. त्यावेळी भाजप ८० पैकी ७१ जागावर निवडूण आले होते. परंतू, येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीसारखे यश मिळणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘सामना’ या मुखपत्रातून शिवसेनेने भाजपवर निशाना साधला आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी आरतीबाज लोकांपासून सावध राहावे – उद्धव ठाकरे

- Advertisement -

नेमकं काय म्हटले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधत भाजपला येत्या लोकसभा निवडणूकीत गेल्या निवडजणूकीसारखे यश मिळणार नाही, असे सांगितले आहे. यासाठी त्यांनी कैराना लोकसभा पोटनिवडणुकीचा दाखला दिला. त्यामुळे कैराना सारखे संपूर्ण उत्तर प्रदेशात विरोधी एकत्र आले तर भाजपचा पराभव होऊ शकतो, अशी शक्यता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर आता येत्या लोकसभा निवडणूकीत आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे मुज्जफरनगर आणि कैरानासारखे बुलंदशहर घडवून आणले जात आहेत का? साठीच गोहत्येचे ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरे आझाद मैदानात, आश्वासनानंतर आंदोलन मागे

- Advertisement -

‘हिंसाचाराच्या खांद्यावर बसून गेम?’

उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, बुलंदशहरात गोहत्येच्या संशयावरून जो हिंसाचार झाला त्यातही असेच काही घडले आहे का? या हिंसाचाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी कोणाचा ‘गेम’ केला आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ज्या सुबोधकुमार सिंह या पोलीस अधिकाऱयाचा बळी या हिंसाचारात गेला त्याच्या भावाने आणि बहिणीने अनेक आरोप केले आहेत. २०१५ मध्ये उत्तर प्रदेशातील दादरी येथे घडलेल्या अखलाख हत्या प्रकरणाचा तपास सुबोधकुमार सिंह यांनीच केला होता. गोमांस बाळगल्याच्या संशयावरूनच त्यावेळी जमावाने अखलाख यांची निर्घृण हत्या केली होती. त्यातील आरोपींच्या अटकेसाठी सुबोधकुमार यांनी कठोर भूमिका घेतली होती असे आता सांगितले जात आहे. त्यामुळे बुलंदशहरातील उद्रेक, त्यात सुबोधकुमार यांचा गेलेला बळी आणि अखलाख प्रकरणातील त्यांची कारवाई याचा काही परस्पर संबंध आहे का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्याचा निकाल पोलीस तपासात लागेलच, पण गोहत्येचे हे ‘संशयपिशाच्च’ देशात आणखी किती जातीय हिंसाचार घडवत राहणार आहे? किती निरपराध्यांचे बळी त्यात जाणार आहेत? असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.


हेही वाचा –  सामना: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंची खिल्ली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -