घरताज्या घडामोडीचहा दिनाच्या दिवशी तरी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकायला नको - मुख्यमंत्री

चहा दिनाच्या दिवशी तरी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकायला नको – मुख्यमंत्री

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचे पहिले अधिवेशन नागपूर येथे होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे सरकारचा चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. “आज चहा दिन आहे, आपले प्रधानमंत्री चहावाले होते, त्यामुळे आज तरी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकायला नको होता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना मारला. अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला चहापान घेणे ही सरकारची प्रथा आहे. मात्र विरोधकांनी त्यावर बहिष्कार घालणे ही पोट प्रथा झालेली आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाचे या कायद्यावर काय म्हणणे आहे. हा कायदा घटनाबाह्य तर नाही ना? याची तपासणी झाल्यानंतरच आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबात आपली भूमिका स्पष्ट करु, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे :

– शेतकऱ्याला कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर घेऊ.

– स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका आधीपासूनच ठरलेली आहे. कालही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आमच्या जुन्या मित्रांनी आम्हाला या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये.

- Advertisement -

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात घोटाळा असल्याच्या तक्रारी आहेत, हे गंभीर आहे. त्याची चौकशी करू मात्र स्मारक उभारणारच.

– समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जाईल.

– आमचं सरकार जनतेला बांधील आहे विरोधकांना नाही, आम्ही जनतेला दिलेली वचने पाळणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -