घरCORONA UPDATE'माझ्या लोकप्रियतेपेक्षा महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होणे महत्त्वाचे' - मुख्यमंत्री

‘माझ्या लोकप्रियतेपेक्षा महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होणे महत्त्वाचे’ – मुख्यमंत्री

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर ठाकरेंनी ट्विटरद्वारे राज्यातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि अधिकारी वर्गाचे आभार मानले आहेत. “लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला. हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे हे यश आहे”, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

IANS आणि सी व्होटर्सन या संस्थांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा सर्व्हे केला होता. या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे क्रमांक पाचचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले होते. विशेष म्हणजे पहिल्या पाचमध्ये एकही भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे नाव नव्हते. या सर्व्हेनुसार ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे सांगितले जात आहे. तर ८२.९६ टक्के लोकप्रियतेसह ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत.

मुख्यमंत्री आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की,

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे, हे महत्त्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी या सर्वांचे आभार! अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नाही.

सगळ्यांचा नम्र,
उद्धव बाळासाहेब ठाकरे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

भारतातील टॉप ५ लोकप्रिय मुख्यमंत्री

नवीन पटनायक, ओडिशा – ८२.९६ टक्के
भुपेस बघेल, छत्तीसगड – ८१.०६ टक्के
पी. विजयन, केरळ – ८०.२८ टक्के
जगनमोहन रेड्डी, आंध्र प्रदेश – ७८.५२ टक्के
उद्धव ठाकरे, महाराष्ट्र – ७६.५२ टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -