कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी; उद्धव ठाकरे यांचा लासूरमध्ये पुनरुच्चार

शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, असे म्हटले आहे.

Aurangabad
uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील लासूर येथीर जाहीर सभेत पुन्हा एकदा कर्जमुक्तीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, असे म्हटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे 

शिवसेनेचा जन्मच शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच झाला आहे. सत्तेमध्ये असून शिवसेना विरोधकांसारखी वागते अशी टीका आमच्यावर केली जाते. आम्ही सत्तेमध्ये जरूर मात्र आम्ही सामन्य माणसाचा आवाज म्हणून शिवसेनेत आहोत. आम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आमच्यात आणि आघाडीमध्ये फरक काय राहिला?. गरज पडल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा केंद्राला भेट दिली. त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी शिवसेना शेतकऱ्यांसोबत असल्याचे म्हटले आहे.

ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर 

संपूर्ण राज्यांमध्ये सध्या दुष्काळाची झळ लागत असताना अद्यापही मान्सूचे आगमन झालेले दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट असताना चिंताग्रस्त शेतकऱ्यांवर दिलासा देण्यास आजचा नाशिक, औरंगाबाद या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे.