घरमहाराष्ट्रओमी कलानींवर पैसे वसुलीसाठी धमकावल्याचा गुन्हा

ओमी कलानींवर पैसे वसुलीसाठी धमकावल्याचा गुन्हा

Subscribe

ओमी कलानी यांच्यावर पैसे वसुलीसाठी व्यापाऱ्याला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून यात एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

ओमी कलानी यांच्यावर पैसे वसुलीसाठी व्यापाऱ्याला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून यात एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी ओमी कलानी यांच्यासह एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ओमी कलानी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मी २४ तास सरकारी पोलिसांच्या संरक्षणात असतो. त्यामुळे असा प्रकार करणं शक्यच नसल्याचं स्पष्टीकरण ओमी यांनी दिलं आहे. हा प्रकार राजकीय वैमानस्यातून झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या अनिल कांजानी हे अहमदाबादच्या एका व्यापाऱ्याला काही लाख रुपये देणं लागत होते. हे पैसे देण्यासाठी उशीर झाल्याने संबंधित व्यापाऱ्याने ओमी कलानी आणि त्यांच्या हस्तकांद्वारे आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा कांजानी यांचा आरोप आहे. या व्यापाऱ्याने आपल्याला कल्याण ते मुंबई आणि मुंबई ते उल्हासनगर असं फिरवलं आणि ओमी कलानीकडे नेलं. तिथे ओमी यांच्या माणसांनी ५० लाख रुपये देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कांजानी यांनी केला आहे. याप्रकरणी ओमी कलानी यांच्यासह एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर ओमी कलानी यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मी २४ तास सरकारी पोलिसांच्या संरक्षणात असतो. त्यामुळे असा प्रकार करणं शक्यच नसल्याचं स्पष्टीकरण ओमी यांनी दिलं आहे. तसंच हा प्रकार राजकीय वैमानस्यातून झाला असून काल रात्री गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात कोण कोण आलं होतं, याचं सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. ओमी कलानी यांची आई ज्योती कलानी या सध्या उल्हासनगरच्या आमदार, तर पत्नी पंचम कलानी या उल्हासनगरच्या महापौर आहेत. त्यामुळे ओमी कलानींवर दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर उल्हासनगरमध्ये खळबळ माजली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ओमी कलानीचा गुन्हेगारी संपविण्याचा नारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -