रत्नागिरीतील्या दाऊदच्या वडिलोपार्जित संपत्तीचा लिलाव होणार

underworld don dawood ibrahim sale in ratnagiri property on 10 November
रत्नागिरीतील्या दाऊदच्या वडिलोपार्जित संपत्तीचा लिलाव होणार

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या कोकणातल्या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रत्नागिरीतील खेडमध्ये दाऊद यांची वडिलोपार्जित संपत्ती आहे. याच संपत्तीचा १० नोव्हेंबर रोजी ऑनलाईन माध्यमातून लिलाव केला जाणार आहे.

भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि १९९३ सालच्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेतील सुत्रधार दाऊद इब्राहिमची रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील कुंबके गावात संपत्ती आहे. संबंधित संपत्तीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री असणार आहे. स्क्वेअरफीटने दिलेल्या वृत्तानुसार, SAFEMA संस्था(स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स) दाऊदच्या या संपत्तीचा १० नोव्हेंबरला लिलाव करण्यात येणार आहे.

दाऊदची रत्नागिरीतील लिलाव करणारी संपत्ती

१८ गुंठे जमीन – राखीव किंमत १.३८ लाख
२० गुंठे जमीन – राखीव किंमत १.५२ लाख
२४.९० गुंठे जमीन – राखीव किंमत १.८९ लाख
२९.३० गुंठे जमीन – राखीव किंमत २.२३ लाख
२७ गुंठे जमीन – राखीव किंमत २.५ लाख
घर क्र. १७२ आणि २७ गुठे जमीन – राखीव किंमत ५.३५ लाख, शिवाय ३० गुंठे जमीन लोटे गावात आहे. याची राखीव किंमत ६१.४८ लाख ठेवण्यात आली आहे.

दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करताना काही प्रक्रिया आहेत. यामध्ये २ नोव्हेंबरला लिलावात बोली लावणाऱ्या संपत्तीची पाहणी करू शकतात. त्यानंतर ६ नोव्हेंबरला ४ वाजण्याच्याआधी सफेमाकडे अर्ज करणे गरजेचे आहे. या अर्जासोबत डिपॉझिटही जमा करावे लागणार आहे. मग १० नोव्हेंबर ई-लिलाव, टेंडर तसेच सार्वजनिक अस तिन्ही पद्धतीने लिलाव केला जाणार आहे.

माहितीनुसार, यापूर्वीच दाऊतच्या संपत्तीचा लिलाव होणार होता. पण कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आले. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लिलाव होणार आहे. याशिवाय दाऊत जवळचा इक्बाल मिर्ची याच्याही मुंबईतील दोन संपत्तीचा लिलाव होणार आहे. सांताक्रूझ येथील मिल्टन अपार्टमेंटमध्ये इक्बालचे दोन फ्लॅट आहेत. या दोन्ही फ्लॅटचा एरिया १ हजार २४५ स्क्वेअर फूट इतका आहे. या दोन्ही फ्लॅटची राखीव किंमत २ कोटी ४५ लाख एवढी करण्यात आली आहे.


हेही वाचा – केरळ सोन तस्करीतही दाऊदचा हात?; NIA ची कोर्टात माहिती