घरताज्या घडामोडीगणेशोत्सव काळात कोकणात अखंडित वीजपुरवठा करा - ऊर्जामंत्री

गणेशोत्सव काळात कोकणात अखंडित वीजपुरवठा करा – ऊर्जामंत्री

Subscribe

गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात २४ तास अखंडित वीज पुरवठा करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात २४ तास अखंडित वीज पुरवठा करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज डॉ. राऊत यांनी कोकणातील विजेच्या कामाबाबत तसेच कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीला खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

कोकणात गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. या कालावधीत रायगडप्रमाणे रत्नागिरी येथेही वीज कपात न करता चोवीस तास वीज पुरवठा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश उर्जामंत्र्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

रोहा येथे २२ केव्ही स्वीचींग उपकेंद्र करण्यासंदर्भात २८०० चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच श्रीवर्धन तालुक्यात अतिउच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्र उभारल्यास दिघी बंदरासाठी ते फायदेशीर ठरू शकेल. रोहा तालुक्यामध्ये आरएसजे पोल्सची आवश्यकता आहे. तळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी मोठ्या शाखा कार्यालयाची विभागणी दोन शाखांमध्ये करण्यासंदर्भातही कारवाई करण्यात यावी, अशी सूचना नितीन राऊत यांनी केली.


हेही वाचा – पुढच्या ४८ तासांत जोरदार पाऊस; तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -