घरमहाराष्ट्रसुपारी किलर पाहिले पण भाषण पाहिले नाही - जावडेकर

सुपारी किलर पाहिले पण भाषण पाहिले नाही – जावडेकर

Subscribe

आजवर सुपारी किलर पाहिले होते. पण सुपारी भाषण पाहिले नाही, अशी बोचरी टिका केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ’… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या एका वाक्याने अक्षरश: धुमाकूळ घातला असून, भाजपाने देखील राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ भाषणाची गंभीर दखल  घेतली आहे. भाजपाकडून देखील आता राज ठाकरेंवर आरोप होऊ लागले असून, सोमवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आजवर सुपारी किलर पाहिले होते. पण सुपारी भाषण पाहिले नाही, अशी टिका करत राज ठाकरे यांच्या सभांची खिल्ली उडवली आहे. मुंबईमध्ये भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच राज ठाकरे कुणासाठी मत मागत आहेत हे सगळ्यांना माहित आहे. चार वर्षांपूर्वी जे राज ठाकरे मोदींची स्तुती करत होते तेच आज टीका करत असल्याचे सांगत राज ठाकरे यांचे भाषण सुपारी घेऊन करत असल्याचा आरोप जावडेकरांनी केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीका केली. तसेच देशात आम्ही ३०० च्या वर जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करताना जावडेकर यांनी बारामती आणि नांदेडमध्ये देखील काँग्रेसचा पराभव होईल असे सांगितले.

देश सुरक्षितांच्या हातात आहे

दरम्यान मोदींनी पाकिस्तानला दम भरल्यानेच पाकिस्तानच्या हद्दीत असलेला भारताचा पायलट अभिनंदन वर्धमान एक दिवसात परतला. त्यामुळे देश सुरक्षित हातात आहे, असे त्यांनी सांगितले. युपीएच्या काळात माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी पाकिस्तान विरोधात कधीही कठोर भूमिका घेतली नाही. मात्र, मोदी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांच्या भूमीत धडा शिकवला. सर्जिकल स्ट्राईक करण्याचे धाडस केवळ मोदीच दाखवू शकतात, असेही जावडेकर यांनी म्हटले आहे. देशात मोदी यांच्या या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे जावडेकर म्हणाले आहे.

- Advertisement -

वाचा – राज ठाकरेंचे आरोप खोडून काढण्यासाठी आता भाजपा नेत्यांमध्येच चढाओढ

वाचा – ‘डासभाऊ’ काय प्रकार आहे? काँग्रेस का घेरतेय उद्धवना?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -