घरमहाराष्ट्र'आजी-माजी आमदारांना आपण पाहिलंत का?'; रावेरमध्ये फलक

‘आजी-माजी आमदारांना आपण पाहिलंत का?’; रावेरमध्ये फलक

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील रावेरसह-यावल तालुक्यात आजी-माजी आमदारांना तुम्ही आपण पाहिलत का? या आशयाचे फलक झळकले आहेत. रावेरमधील अनेक ठिकाणी हे फलक पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली. हे फलक कुणी आणि अचानक का लावले? असा सवाल स्थानिकांना पडत आहे. याशिवाय रावेर आणि यावल दोन्ही तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सध्या याच फलकांची चर्चा सुरु आहे. याप्रकरणी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इच्छूकांच्या भाऊगर्दीने आधीच हा मतदारसंघ चर्चेत असताना अचानक दोघा इच्छूक आजी-माजी आमदारांविषयी फलक लागल्याने नानाविध चर्चेला ऊत आला आहे.

‘या’ नेत्यांचे नाव बॅनरमध्ये

बॅनरमध्ये अज्ञातांनी आमदार हरीभाऊ जावळे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचे फोटो लावले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. खोडी काढणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, यावल-रावेर मतदारसंघात लावण्याचा खोडसाळपणा करणार्‍यांनी बॅनर्स लावण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेतली आहे का? असा प्रश्‍न आमदार जावळे यांनी उपस्थित केला. सध्या नगर परिषदेकडून हे बॅनर त्वरित काढण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -