पतीचे हरवलेले पाकीट परत देण्यासाठी शरीरसुखाची मागणी

Satara
Smartphone
प्रातिनिधिक फोटो

पतीचे हरवलेले पाकीट परत देण्यासाठी चक्क महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील शाहूनगरमध्ये  घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ४१ वर्षीय पीडित महिलेचा पती दोन दिवसांपूर्वी कामावरून घरी येत असताना वाटेत पाकीट आणि मोबाईल हरविला. त्या मोबाईलवर पत्नीने फोन केला असता संबंधित व्यक्तीने तुझ्या नवऱ्याचा मोबाईल आणि पाकीट पाहिजे असेल तर माझ्याशी शरीर संबंध ठेव, अशी आश्चर्यचकित करणारी मागणी केली.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मोबाईल लोकेशनवरून संबंधिताचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here