Video: पुण्यात मोबाईलच्या बदल्यात त्यानं थेट केलं ‘किस’!

पुण्यात भर रस्त्यात एका अज्ञात तरुणाने तरुणीला किस केल्याप्रकरणी त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणाचा शोध सुरु आहे.

Pune
unknown person kissing girl at pune
रस्त्यात किस्स करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एक तरुणी रस्ता चुकते. रस्ता चुकलेल्याची माहिती विचारण्यासाठी ती आपला मोबाईल खिशातून बाहेर काढते. मात्र त्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाल्याने तिची धांदल उडते आणि ती रस्त्यावरुन जाणाऱ्या एका तरुणाकडे आपल्या मित्राला फोन करण्यासाठी मोबाईल मागते. त्या मोबाईल वरुन ती आपल्या मित्राला फोन करुन रस्ता चुकल्याचे कळवते आणि मित्राशी फोनवर बोलून झाल्यानंतर ती त्या तरुणाला मोबाईल देऊन आभार मानते. मात्र, आभार मानताना ती तरुणी शेकहँड करण्यासाठी हात पुढे करते. मात्र, त्यावेळी तो तरुण तेच हात पकडतो आणि तिला ‘किस’ करतो. ही घटना कोणत्याही चित्रपटातील नसून ही सत्य घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – शाहिद सोबत किती किस झाल्या ते आठवत नाही – कियारा

नेमके काय घडले?

पुण्यातील हॉटेल अरोरा टॉवर्स या ठिकाणी बालेवाडी येथे राहणारी २१ वर्षीय तरुणी रस्ता चुकते. मात्र त्या रस्त्याची विचारणा ती इतर कोणाला न करता ती एका अज्ञात तरुणाकडे मोबाईल मागत थेट आपल्या मित्राला फोन करते. मोबाईल दिल्यामुळे ती त्या अज्ञात तरुणाचे आभार मानते आणि त्या दरम्यान हा किसचा किस्सा घडल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी तरुणीने पोलिसात त्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.