Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सिंधुदुर्गात २८ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्गात २८ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला दिला पुन्हा एकदा जोर का झटका

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात जोरदार फाईट आहे. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे. नितेश राणे यांच्या पुढाकाराने 28 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या 103 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यातील 28 ग्रामपंचायत सदस्य राणेंच्या पुढाकाराने बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातील वर्चस्व कायम असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -