घरताज्या घडामोडीमुंबईचा धोका टळला; पुणेकरांनो काळजी घ्या, वादळाने दिशा बदलली!

मुंबईचा धोका टळला; पुणेकरांनो काळजी घ्या, वादळाने दिशा बदलली!

Subscribe

गेले काही तास मुंबईकरांवर निसर्ग या चक्रीवादळाची टांगती तलवार आहे. कोरोनाबरोबर आता निसर्ग चक्रीवादळाचं संकट राज्यावर घोंघावत होतं. निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनकालपासूनच सज्ज होते. साधारण दुपारी १ वाजता अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर हे वादळ धडकलं. मात्र मुंबईकरांचा धोका टळला. या वादळाने आपला मार्ग बदलला आहे. हे वादळ आता राज्याच्या इतर भागातून जाणार असल्याचं समजत आहे.

निसर्गाने दिशा बदलली

निसर्ग चक्रीवादळाने आता मार्ग बदलला आहे. अलिबाग नंतर मुंबईकडे न येता हे वादळ पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गाने जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे वेधशाळेच्या प्रमुख हवामान संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांना हा अंदाज वर्तवला आहे. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ किनारपट्टीला धडकले आहे. वादळ धडकल्यानंतर ताशी १०० ते १२० किलोमीटर चक्रीकार वारे वाहून पाऊस पडत आहे.

- Advertisement -

पुणेकरांनो काळजी घ्या

चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यावर पोहचल्यानंतर याचे पडसाद पुण्यातही उमटतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी पुण्यात वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ७० किमी असेल. पुणे जिल्हयातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज (मंगळवारी) रात्री उशिरापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुनी घरं झाडं विजेचे पोल यांचे या वाऱ्याच्या वेगामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.  पुणे जिल्ह्यात नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


हे ही वाचा – वादळ ईशान्य दिशेला वळणार, सहा तासांत तीव्रता कमी होणार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -