घरCORONA UPDATEयूपीएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

यूपीएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

आता यूपीएससीची परीक्षा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्याचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना प्रसाराच्या धोक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेची तारीख करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आयोगानं परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.

केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचं आयोगानं जाहीर केले होते. पण, परिस्थितीत सुधारणा न झाल्यानं आयोगानं अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. या संदर्भात शुक्रवारी (५ जून) आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेले वेळापत्रक

upsc time table

UPSC परिक्षेचे वेळापत्रक

४ ऑक्टोबर : फाॅरेस्ट आणि सिविल सर्विसेस प्रिलिम परिक्षा

- Advertisement -

८ जानेवारी २०२१ : सिविल सर्विस मेन्स परिक्षा

२८ फेब्रुवारी २०२१ : फाॅरेस्ट सर्विस मेन्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -