पुण्यामध्ये उत्सवाच्या काळात होणार नियमानुसार स्पीकर्सचा वापर

शहरामध्ये येणार्‍या विविध उत्सवाच्या काळात नियमानुसार स्पीकर्सचा वापर करण्याचा निर्णय पुणे साऊंड ऍन्ड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशनच्या बैठकीत सर्व संमतीने निर्णय घेण्यात आला आहे.

Pune
Speakers
लाऊड स्पीकर (सौजन्य-हिंदुस्तान टाईम्स)

शहरामध्ये येणार्‍या विविध उत्सवाच्या काळात नियमानुसार स्पीकर्सचा वापर करण्याचा निर्णय पुणे साऊंड ऍन्ड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशनच्या बैठकीत सर्व संमतीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवात स्पीकरचा दणदणाट नसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर ही बैठक पुण्याच्या शुभारंभ हॉल येथे नुकतीच घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष बबलू रमजानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, कार्याध्यक्ष राजू कांबळे, उपकार्याध्यक्ष स्टीवन नाथन, खजीनदार मेहबूब खान, सेक्रेटरी मृणाल ववले आणि उपसेक्रेटरी रमेश धोत्रे यांच्यासह असोसिएशनचे साधारण ७०० सदस्य उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी सदस्यांनी केलेल्या भाषणात विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. यामध्ये प्रमुख मुद्दे असे की, न्यायालयाच्या नियमाचे सर्व सदस्य पालन करतील. आगामी उत्सवांमध्ये सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकार्‍यांसोबत नियमांचे काटेकोरपणे पालन करून शहरातील उत्सव अधिक चांगला कसा होईल, यासंबंधी काळजी घेतली जाईल. नागरिक तसेच पोलीस प्रशासनासोबत चांगला समन्वय राखून राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील सगळे उत्सव व्यवस्थित पार पाडले जातील.

असोसिएशच्या बैठकीची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. राष्ट्रगीतानंतर माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, कोल्हापूर-सांगली येथील बोट उलटून झालेल्या अपघातात मृत्यु झालेल्या नागरिकांना तसेच असोसिएशनचे ज्या सदस्यांचा मृत्यु झाला, अशा सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीचे कामकाज सुरू करण्यात आले. बैठक झाल्यानंतर कार्यकारिणीच्या नवीन पदाधिकार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

हेही वाचा –

‘त्या’ प्रकरणी पलक तिवारीने मांडली सोशल मीडियावर बाजू

पॉर्न व्हिडिओतून मला काहीच पैसे मिळाले नाहीत – मिया खलिफा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here