घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीत दुर्लक्षित उदयनराजेंना भाजपात घेण्यासाठी नेते उतावीळ

राष्ट्रवादीत दुर्लक्षित उदयनराजेंना भाजपात घेण्यासाठी नेते उतावीळ

Subscribe

राष्ट्रवादीत दुर्लक्षित झालेले सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पक्षात घेण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. सातारची जागा आपसूक निवडून येईल, हे लक्षात घेत भोसले यांच्यासाठी भाजपच्या नेत्यांनी रेड कार्पेट अंतरले आहे. गेल्या आठवड्यात भाजपच्या पाच नेत्यांनी भेटी घेऊन त्यांनी पक्षात प्रवेश घेण्यासाठी निमंत्रण दिल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पक्षाचे खासदार असूनही उदयनराजे भोसले सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षाच्या नेत्यांविरोधी टीका करत होते. त्यातच अजित पवार आणि भोसले यांचे अजिबात जमत नाही. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत भोसले यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षात प्रचंड वाद आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजे यांना उघडरित्या विरोध दर्शवला आहे. या विरोधामुळे पक्षाला जड झालेल्या उदयनराजे यांना उमेदवारी मिळणे अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने भोसले यांच्यावर स्तुती सुमने उधळून त्यांना पक्षाची उमेदवारी देण्याची परस्पर घोषणाही करून टाकली आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात उदयनराजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आले होते. तेव्हाही भाजपच्या काही नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. या दौर्‍यावेळी चंद्रकात पाटील यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. ‘खासदार उदयनराजे भोसले हे कुणाला भीत नाहीत, तर ते सर्वांना खिशात घेऊन फिरतात’ असे व्यक्तव्य करत मंत्र्यांनी उदयनराजे यांची तरफदारी केली होती. चंद्रकांत पाटील आणि खा.उदयनराजे कराडपासून सातार्‍यापर्यंत एकाच गाडीत गेल्यामुळे ते भाजपवासी व्हायला फारवेळ नाही, अशी चर्चा जिल्ह्यात होती.

७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्यानंतर लगेचच ९ ऑक्टोबरला उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी उदयनराजे यांना सन्मानाने या, असे निमंत्रण दिले. उदयनराजे यांच्या भाजप नेत्यांबरोबरच्या सततच्या भेटीगाठींनंतर ते भाजपामध्ये जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या अंतर्गत आमदार गटांमध्ये व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात विरोधाचे वातावरण सुरू आहे. मात्र सातार्‍याच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून उदयनराजेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -