Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश १६ जानेवारीपासून लसीकरण सर्व राज्यांनी अफवांना आळा घालावा - पंतप्रधान

१६ जानेवारीपासून लसीकरण सर्व राज्यांनी अफवांना आळा घालावा – पंतप्रधान

Related Story

- Advertisement -

16 जानेवारीपासून आपण देशातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून अफवांना आळा घालण्याचे काम राज्य सरकारांनी करायचे आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी राज्यातील मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली. त्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे.

येत्या काही महिन्यांत 30 कोटी लोकांना लसीकरण करण्याचा आमचा मानस असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. कोरोना लसीबाबत बर्‍याच अफवा पसरवल्या जात आहेत, त्या टाळा, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला. पंतप्रधान म्हणाले की, अशा अफवांना लगाम घालणे ही राज्यांची जबाबदारी आहे. कोरोना लसीकरणासंदर्भात वैज्ञानिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण काम करत राहू, आम्ही त्याच दिशेने गेलो आहोत, असेही मोदींनी अधोरेखित केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपत्कालीन वापरासाठी अधिकृत केलेल्या दोन लसी भारतात तयार केल्या गेल्या आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. भारताला लसीकरणाचा अनुभव, दुर्गम भागात पोहोचण्याची व्यवस्था कोरोना लसीकरणासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. 16 जानेवारीपासून आपण देशातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोदी म्हणाले, सर्वात आधी फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर सफाई कर्मचार्‍यांना लस टोचण्यात येईल. त्यानंतर पोलीस कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा बलाच्या जवानांना लसीकरण करण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 50 वर्षांच्या वरील लोक आणि जे जास्त करून संवेदनशील आहेत, त्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांनी सर्वात आधी लस टोचून घ्यावी –नवाब मलिक
देश कोरोना लसीकरणासाठी सज्ज झाला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने यानिमित्ताने लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

अफवांना आळा घाला
अफवा, लसीसंबंधित वाईट प्रचाराला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आळा घालावा. देश आणि जगातील अनेक घटक आपल्या अभियानाला अडथळा आणण्यासाठी कुरघोडीचा प्रयत्न करू शकतात. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत योग्य माहिती पोहोचवून अशा प्रत्येक प्रयत्नांना आपण मोडून काढणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -