घरमहाराष्ट्रपहिल्याच दिवशी गोवर-रुबेलाचं दहा लाखांहून अधिक बालकांना लसीकरण

पहिल्याच दिवशी गोवर-रुबेलाचं दहा लाखांहून अधिक बालकांना लसीकरण

Subscribe

राज्यात २७ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात १० लाख ७७ हजार ३३८ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

राज्यात मंगळवार म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात १० लाख ७७ हजार ३३८ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यासोबतच लसीकरणानंतर राज्यभरात जवळपास ४० ते ५० बालकांना खाज येणे, पुरळ अशा स्वरुपाची लक्षणे जाणवली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. पण, राज्यात एकाही बालकावर लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणाम झाल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे पालकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे.

वाचा : भारतातील ४२ कोटी मुलांचं होणार गोवर-रुबेला लसीकरण

- Advertisement -

सहा आठवडे सुरू राहणार ही मोहिम

बुधवारी राज्यात सर्वत्र जवळपास १० हजार २५५ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून १० लाख ७७ हजार ३३८ बालकांना ही लस देण्यात आली. सहा आठवड्यात ९ महिने ते १५ वर्षाखालील सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार लसीकरणाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. २०२० पर्यंत गोवर-रुबेलाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष भारत सरकारचं आहे. त्यानुसार प्रयत्न केले जात आहेत.

वाचा : २७ नोव्हेंबरपासून राज्यात ‘गोवर-रुबेला’ लसीकरण मोहिम

- Advertisement -

आरोग्यमंत्र्यांनी दिली लसीकरणाची माहिती

याविषयी अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी सांगितलं की, “गोवर-रुबेलाची लस सुरक्षित आहे. त्यामुळे लसीकरणानंतर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. काही ठिकाणी या लसीकरणाबाबत अफवा पसरवल्या जात आहे, त्यामुळे पालकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत बालकांना या दोन आजारांपासून अतिरिक्त संरक्षण मिळण्याकरता ही लस टोचून घेणे आवश्यक आहे. या लसीमुळे कुठलाही विपरित परिणाम होत नसून शारीरिक दुर्बलता येत नाही, त्यामुळे राज्यभरातील पालकांनी लसीकरणात सहभागी व्हावे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -