घरमहाराष्ट्रव्हॅलेंटाईन डे स्पेशल : पोलीस कर्मचाऱ्याच्या जेव्हा जुळून येती रेशीमगाठी...

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : पोलीस कर्मचाऱ्याच्या जेव्हा जुळून येती रेशीमगाठी…

Subscribe

एकाच व्यवसायात असलेल्या दोन जणांचे एकत्र येणं आणि तेही केवळ योगायोगाने ही देवाचीच इच्छा मानून सांगवीतील पोलीस जोडप्यानी त्यांच वैवाहिक जीवन आनंदी ठेवलं आहे. हे कर्तव्यदक्ष जोडपं त्यांच दुसरं व्हॅलेंटाईन साजरं करत आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांना आपला परिवार, पत्नी, मुला-बाळांना विसरून कर्तव्य पार पाडावे लागते. त्यामुळे त्यांना व्हॅलेंटाईन डे असो की ख्रिसमस हे दिवस साजरे करता येत नाहीत. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांना सर्व काही विसरून ड्युटीवर हजर रहावे लागते. मात्र एकाच पोलीस स्थानकात पती आणि पत्नी असल्यास त्यांनादेखील या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशाच एका कर्तव्यदक्ष पोलीस जोडप्याची व्हॅलेंटाईन डे दिवसानिमित्तची ही गोष्ट आहे.

कर्तव्यदक्ष पोलीस जोडप्याचा आनंद 

पोलीस कर्मचारी अनुपमा पंडित आणि शिमोन चांदेकर यांचा प्रेमविवाह नसला तरी तसे म्हणायला हरकत नाही. त्यांचा हा दुसरा व्हॅलेंटाईन डे असून तो एकमेकांसोबत साजरा करत आहेत. दुसऱ्यांचा व्हॅलेंटाईन डे सुरळीत आणि सुरक्षित व्हावा यासाठी दोघेही कर्तव्य बजावत आहेत. दोघांचा विवाह हा केवळ योगायोगाने जुळला आहे. हे दोघेही गेल्या दोन वर्षापासून सांगवी पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. २०१५ ला पुण्याच्या मुख्यालयामध्ये दोघे एकत्र काम करत होते. परंतु २०१६ मध्ये शिमोन चांदेकर यांची बदली सांगवी पोलीस स्थानकात झाली. देवानेच यांची रेशीमगाठ बांधली असावी म्हणून योगायोगाने काही महिन्यातच अनुपमा पंडित यांचीदेखील बदली सांगवी पोलीस स्थानकात झाली. या दोघात प्रेम प्रकरण नव्हते, विशेष म्हणजे २०१२ ला नातेवाईकांडून अनुपमा पंडित यांना शिमोन यांच स्थळ आलं होतं. पण मला पोलीस नवरा नको होता, असं तिने घरच्यांना ठणकावून सांगितलं होतं. हा किस्सा आपलं महानगरशी बोलताना पोलीस कर्मचारी अनुपमा पंडित यांनी सांगितला.

- Advertisement -

गेल्या वर्षी त्यांचा विवाह झाला 

दोघेही एकाच पोलीस स्थानकात काम करत होते. शिमोनचा शांत स्वभाव असल्याने ते एकमेकांशी कमीच बोलायचे. एके दिवशी अनुपमाच्या आईने शिमोनबद्दल अनुपमाला विचारलं. शिमोनबद्दलची माहिती, त्याचा स्वभाव सर्व माहित असल्याने अनुपमाने होकार दिला. घरच्यांनी नोव्हेंबर महिन्यात विवाह नक्की केला. २०१८ च्या ९ जानेवारी रोजी ख्रिश्चन धर्म पद्धतीनुसार त्यांचा विवाह झाला. आता ते सुखाने संसार करत असून त्यांना एक गोंडस मुलगा देखील आहे. हा विवाह केवळ योगायोगाने झाला, लग्न होईल असं वाटत नव्हतं, असं पोलीस कर्मचारी शिमोन म्हणाले. आज दोघेही त्यांचा दुसरा व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -