CAA, NRC विरोधात २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद

Mumbai
prakash-ambedkar
अॅड. प्रकाश आंबेडकर

एनआरसी, सीएए आणि देशातील ढासळलेल्या अर्थ व्यवस्थेच्या विरोधात २४ जानेवारीला मुंबईसह राज्यव्यापी बंद करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने जाहीर केला आहे. दादर येथील आंबेडकर भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बंदची घोषणा केली.

२४ तारखेला मुंबईसह महाराष्ट्र बंद करण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांची बैठक आज सकाळी आंबेडकर भवनात घेण्यात आली होती. देशात एनआरसी सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. आर्थिक आणीबाणी मुळे २७ लाख कोटी गोळा होणे अपेक्षित होते. देश चालवण्यासाठी इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ११ लाख कोटी जमा झाले असल्याचे सांगण्यात आले. उरलेला निधी कसा जमा होईल हा प्रश्न आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही, देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

त्याविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद करणार येणार आहे. यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील संस्था संघटना, राजकीय पक्ष यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. पत्रकार परिषदेत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.