वेश्याव्यवसायापेक्षा डान्स बार चांगला – वर्षा काळेची मुक्ताफळे

वेश्याव्यवसायापेक्षा डान्स बार चांगला असे मत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी व्यक्त केले आहे.

Mumbai
dance-bar
प्रातिनिधिक फोटो

राज्यभरातील डान्स बारबालांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला असून वेश्याव्यवसायापेक्षा डान्स बार केव्हाही चांगला, असे मत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारनं डान्स बारसंदर्भात लागू केलेल्या अटींविरोधात काळे यांनी सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून सुप्रीम कोर्टाने डान्स बार मालकांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यामध्ये पुन्हा डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डान्स बार हा महिलांसाठी रोजगार

सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे की, ‘डान्स बार हा खूप मोठ्या संख्येने महिलांसाठी रोजगाराचं साधन होतं. मात्र सरकारनं लादलेल्या अटी इतक्या जाचक होत्या की त्यांच्यासह डान्स बार चालवणं अशक्य होतं’. यामुळे ‘डान्स बार बंद झाल्यामुळे अनेक बारबालांना रोजगारासाठी वेश्याव्यवसायाकडे वळावे लागले’. मात्र ‘वेश्याव्यवसायाला संरक्षण नसून हा अत्यंत जोखमीचा व्यवसाय आहे’. तसेच ‘वेशव्यवसायापेक्षा महिलांना डान्स बारमध्ये अधिक सन्मानाने काम करता येईल’ असे मत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी व्यक्त केले आहे.


वाचा – डान्स बारची ‘छमछम’ पुन्हा; सुप्रीम कोर्टाचा दिलासा