घरमहाराष्ट्रवरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंगची येरवडा कारागृहात रवानगी

वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंगची येरवडा कारागृहात रवानगी

Subscribe

भीमा-कोरगाव हिंसाचार आणि नक्षली कारवायांमध्ये सहभागाप्रकरणी अटकेत असलेले वरवरा राव व अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांची रवानगी पुन्हा एकदा येरवडा कारागृहात करण्यात आली. चौकशीसाठी या दोघांनाही गडचिरोली पोलिसांना कधीही ताब्यात घेता येणार आहे. सोमवारी पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांना पुन्हा अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर या दोघांना पुन्हा पुणे पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. या दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

प्रा. वरवरा राव यांच्यासह नागपुरातील वकील सुरेंद्र गडलिंग यांना गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून दोघे पुणे पोलिसांच्या ताब्यातच होते. गडचिरोली जिल्ह्यात 2016 मध्ये सूरजगड डोंगरावर माओवाद्यांनी 80 वाहने जाळली होती. यामध्ये जहाल माओवादी नेता नर्मदक्कासह मृत कमांडर साईनाथचाही सहभाग होता. पोलिसांकडून या प्रकरणात वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेची चौकशी सुरू होती.

- Advertisement -

पोलिसांना सापडलेल्या काही हार्ड डिस्कसह कागदपत्रांवरून गडचिरोली पोलिसांनी सूरजगडच्या जाळपोळ प्रकरणात प्रा. वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग या दोघांविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. गेल्या 31 जानेवारी रोजी गडचिरोली पोलिसांनी या दोघांना पुणे कारागृहातून ताब्यात घेतले होते. या दोघांना अहेरीच्या न्यायालयाने 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांना पुन्हा अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -