Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र वसंत गिते, सुनील बागूल यांचा आज शिवसेना प्रवेश, भाजपला मोठा धक्का

वसंत गिते, सुनील बागूल यांचा आज शिवसेना प्रवेश, भाजपला मोठा धक्का

भाजपला खिंडार पाडण्यात शिवसेना नेते खासदार राऊत व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना यश

Related Story

- Advertisement -

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागूल यांच्या शिवसेना प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, आज (दि.८) ते शिवबंधन बांधणार आहेत. सायंकाळी ५ वाजता मातोश्रीवर हा प्रवेश सोहळा होणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणूक वर्षभरावर असतानाच भाजपला खिंडार पाडण्यात शिवसेना नेते यशस्वी झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

नाशिकमध्ये आलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी गिते आणि बागूल या दोघांचीही भेट घेत चर्चा केली होती. बागूल यांच्या मातोश्री सध्या भाजपकडून नाशिकच्या उपमहापौर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब सानप यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच शहरातील राजकीय खेळींना सुरुवात झाली. बागूल आणि गिते यांच्या शिवसेना प्रवेशाने खासदार राऊत आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे भाजपला खिंडार पाडण्यात यशस्वी झाल्याचे मानले जाते आहे. या प्रवेशासंदर्भात शुक्रवारी सकाळी ११ वाजता बागूल आणि गिते यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यात या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार आहे.

- Advertisement -