घरताज्या घडामोडीइंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या पुतळ्याला प्रकाश आंबेडकरांचा विरोध

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या पुतळ्याला प्रकाश आंबेडकरांचा विरोध

Subscribe

इंदू मिलमधील बहुप्रतिक्षित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे कामकाज महाविकास आघाडी सरकारच्या काळात जोरात सुरु झाले आहे. काही दिवसांपुर्वीच महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी इंदू मिलमधील आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध केला आहे. इंदू मिलमधील स्मारकासाठी जो निधी दिला जात आहे. तो वाडिया हॉस्पिटलला द्यावा, अशी मागणी प्रकाश आबंडेकर यांनी केली आहे.

वाडिया रुग्णालयाला मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून निधी मिळाला नसल्यामुळे रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर होते. स्मारकासाठी पैसे आहेत मात्र रुग्णांसाठी नाहीत, असे म्हणत हायकोर्टाने यावर ताशेरे ओढले होते. कोर्टाच्या या भूमिकेची री आता प्रकाश आंबेडकर यांनी ओढली आहे. ते म्हणाले की, इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त पुतळा उभा करण्यासाठी दिली गेलेली नाही. तर तिथे डॉ. बाबासाहेबांचे जे आंतरराष्ट्रीय – राष्ट्रीय स्तरावरील समाजशास्त्रीय आणि राजशास्त्रीय विचारांचे केंद्र बनावे अशी अपेक्षा होती. मी उच्च न्यायालयाला विनंती करतो की इंदू मिलमधील स्मारकाला जो काही निधी मिळतोय, तो तातडीने वाडिया हॉस्पिटलला द्यावा.

- Advertisement -

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदू मिलची जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीज दिली होती. मात्र इथल्या राजकारण्यांनी या जागेवर पुतळा बांधण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे माननीय हायकोर्टाने पुतळ्याला मिळालेले पैसे वाडियाला द्यावेत, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -