घरताज्या घडामोडीएक राजा बिनडोक, तर दुसरा...; उदयनराजेंचं नाव न घेता प्रकाश आंबेडकरांची जहरी...

एक राजा बिनडोक, तर दुसरा…; उदयनराजेंचं नाव न घेता प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव न घेता ‘एक राजा बिनडोक आहे’ अशी जहरी टीका केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. हे जाहीर करताना प्रकाश आंबेडकरांनी जहरी टीका केली आहे.

उदयनराजेंवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ज्या माणसाला घटना माहिती नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचे आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं काय पाठवलं? हा प्रश्न पडतो,” अशा शेलक्या शब्दांत उदयनराजेंवर टीका केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबतही काहीसा नाराजीचा सूर लावला.

- Advertisement -

संभाजीराजांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “दुसरे म्हणजेच संभाजीराजे यांनी भूमिका घेतली आहे हे खरं आहे मात्र ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिक भर देत असल्याचं दिसतंय,” असं आंबेडकर म्हणाले. मराठा आरक्षणाला आपण पाठिंबा दिला आहे, त्यामुळे बंदलाही आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका आम्ही जाहीर केली असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं.

प्रकाश आंबेडकरांची उदयनराजे भोसलेंवर जहरी टीका | vba president prakash ambedkar criticized udayanraje bhosale

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव न घेता ‘एक राजा बिनडोक आहे’ अशी जहरी टीका केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. हे जाहीर करताना प्रकाश आंबेडकरांनी जहरी टीका केली आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, 8 October 2020

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -