घरमहाराष्ट्रकार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर परिसरातील वाहतुकीत बदल

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर परिसरातील वाहतुकीत बदल

Subscribe

कार्तिकी वारीच्या कालावधीत पंढरपूर तसेच या परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये याकरता पंढरपूर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

कार्तिकी वारीच्या कालावधीत पंढरपूर तसेच या परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये याकरता पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) मनोज पाटील यांनी पंढरपूर शहरातील महत्वाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक आणि प्रवेश बंद याबाबतचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये जारी केले आहेत. कार्तिकी वारीनिमित्त वाहतुकीमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. पंढरपूरमध्ये सोमवार, १९ नोव्हेंबर रोजी कार्तिकी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत.

पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांबाबत

  1. नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळ कडून येणारी वाहने करकंब कॉस रोड, तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील
  2. पुणे , सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी किंवा कॉलेज क्रॉस चौकीच्या पाठीमागील जागा किंवा के. बी. पी. कॉलेजच्या पाठीमागील लिंक रोड लगतच्या मैदानात पार्किंग करतील
  3. कराड, सांगली, मिरज सांगोला मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्किंग केली जातील
  4. कोल्हापुर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने ही यमाई, तुकाई पार्किंग किंवा बिडारी बंगला पार्किंग येथे पार्क करतील किंवा ही वाहने कासेगांव फाटा, टाकळी मार्गे येऊन टाकळी हायस्कूल मैदान किंवा वेबर हाऊस येथे पार्किंग केली जातील
  5. विजापूर, मंगळवेढाकडून येणारी वाहने ही अनवली फाटा, कासेगाव गाव, कासेगांव फाटा मार्गे येऊन यमाई तुकाई पार्किंग किंवा बिडारी बंगला पार्किंग येथे पार्क करतील किंवा ही वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे येऊन टाकळी हायस्कूल मैदान किंवा वेअर हाऊस येथे पार्किंग केली जातील

शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहतुकीबाबतची व्यवस्था

  1. टेंभुर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉसरोड, करकंब चौक मार्गे जातील
  2. पुणे, साताराकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक ते नवीन कराड चाक, कॉलेज क्रॉस रोड, वाखरी मार्गे इच्छित स्थळी जातील
  3. विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक ते नवीन कराड नाका गादेगाव फाटा पासून संबंधित मार्गाने इच्छित स्थळी जातील

पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबतचे बदल

  1. २३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल
  2. महाद्वार चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारचे वाहनांसाठी तसेच वाहतुकीसाठी प्रवेश बंद राहील
  3. सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद राहील
  4. बार्शी सोलापूर मार्गावरुन तीन रस्ता येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात उतरतील
  5. नियमित येणारी सर्व वाहने आणि यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेस यांना जुना दगडीपूल ते तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येत आहे
  6. मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक मार्गाने शहरात सर्व प्रकारचे वाहनास प्रवेश बंद राहील
  7. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक सावरकर चौक ते अर्बन बँक भक्तीमार्ग ते काळामारुती चौक मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील
  8. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण अभियानांतर्गत भिमा नदी पुल ते मटण मार्केट ते अर्बन बँक रस्त्याचा समावेश असल्याने सदर मार्गावर सर्व वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे

दरम्यान पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली 

  1. नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील
  2. पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस मैदान किंवा कॉलेज क्रॉस चौकीच्या पाठीमागील जागा किंवा के. बी. पी. कॉलेजच्या पाठीमागील रोड लगतच्या मैदानात पार्किंग करतील
  3. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्किंग करता येतील
  4. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने यमाई तुकाई पार्किंग किंवा बिडारी बंगला पार्किंग येथे पार्क करतील किंवा कासेगांव फाटरा, टाकळी मार्गे येवून हायस्कुल मैदान किंवा वेअर हाऊस येथे पार्किंग करता येतील
  5. विजापूर, मंगळवेढा कडून येणारी वाहने अनवली फाटा, कासेगांव गाव, कासेगांव फाटा मार्गे येवून यमाई तुकाई पार्किंग किंवा बिडारी बंगला पार्किंग येथे पार्क करतील किंवा सदर वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे येवून टाकळी हायस्कूल मैदान किंवा वेअर हाऊस येथे पार्किंग करीता जातील
  6. यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण येथे तसेच संबंधित मठामध्ये पार्क होतील व इतर वाहने जुन्या कराड नाक्यासमोरील रेल्वे मैदान व मार्केट यार्ड येथे पार्क होतील
  7. शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पर्किंग होणार नाहीत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -