घरताज्या घडामोडीCorona: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण!

Corona: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण!

Subscribe

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातली माहिती त्यांच्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून देण्यात आली आहे. सध्या ते होम क्वारंटाईन झाले आहेत. उपराष्ट्रपती यांची पत्नी उषा नायडू यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्या सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विट अकाऊंटवरून अशी माहिती देण्यात आली आहे की, ‘आज म्हणजे २९ सप्टेंबरला सकाळी रुटीन कोरोना चाचणी करून घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची तब्येत बरी आहे आणि त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाही आहेत.’

- Advertisement -

यापूर्वी २ ऑगस्टला गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटल उपचार सुरू होते. त्यानंतर १४ ऑगस्टला त्यांच्या कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.

- Advertisement -

दरम्यान कोविड-१९ इंडिया ट्रॅकरच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ६१ लाख ९३ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे. यापैकी आतापर्यंत ९६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५१ लाख ४५ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ९ लाख ५० हजारांहून अधिक रुग्ण Active आहेत.


हेही वाचा – Corona In Maharashtra: राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७८ टक्क्यांवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -