घरमहाराष्ट्रपवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची मोठी लाट - विजय शिवतारे

पवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची मोठी लाट – विजय शिवतारे

Subscribe

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची मोठी लाट असल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची मोठी लाट आहे. बारामतीच्या विद्यमान खा. सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात कुठेही विकास केला नाही. त्यांनी फक्त काठ्या, चष्मे, श्रवणयंत्र वाटले. याला विकास म्हणत नाहीत”, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. तसंच ही काम मंडळाचे कार्यकर्तेही करतात, अशी टीकाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेंनी केली. सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय आहे.

फक्त नेत्यांची मुले पक्षात घेणार का?

फक्त नेत्यांची मुलं म्हणून पक्षात घेणार का ? असा सवाल शिवतारे यांनी विचारला आहे. पुण्यातील वैशाली हॉटेल येथील कट्ट्यावर शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार यांना वाऱ्याची दिशा समजल्याने माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.सध्या मावळमधून पार्थ पवार आणि नगर येथून सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. या दोघांचे काय कर्तुत्व आहे. ते केवळ नेत्यांची मुले आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देणार का? असा सवाल विचारताना या दोघांनी किमान दहा वर्ष समाजासाठी काम करण्याची आवश्यकता होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा विचार पक्षांनी करायला हवा होता असं मत त्यांनी व्यक्त केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -