Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ मंत्र्याचा पासपोर्ट जप्त! षडयंत्राचा दावा!

राज्य मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ मंत्र्याचा पासपोर्ट जप्त! षडयंत्राचा दावा!

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट आज नागपूर पासपोर्ट कार्यालयाने जप्त केला आहे. त्यांच्याविरोधात विधानपरिषदेतील भाजपचे माजी सदस्य मितेश भांगडिया यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयाने कागदपत्रांची तपासणी करून वडेट्टीवार यांना न्यायालयात बोलावले, तेव्हा त्यांनी पासपोर्ट जमा केल्याची माहिती न्यायालयाला दिली. या प्रकरणी ‘माझ्याविरोधात षडयंत्र केलं जात आहे’, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच, आपल्याविरोधात कोणतेही गुन्हे दाखल नाहीत, अशी देखील भूमिका त्यांनी मांडली आहे. नागपूर पासपोर्ट कार्यालय या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहे.

नक्की झालं काय?

भाजपचे माजी विधानपरिषद सदस्य मितेश भांगडिया यांनी वडेट्टीवार यांच्याविरोधात थेट कोर्टात धाव घेतली आहे. वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी दोन वेळा केलेल्या अर्जांमध्ये त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आली असल्याचा आरोप भांगडिया यांनी याचिकेमध्ये केला आहे. आपण पोलीस आणि खुद्द मुख्यमंत्री कार्यालयात याप्रकरणी पाठपुरावा करून देखील कारवाई न झाल्याने अखेर कोर्टात धाव घ्यावी लागली, अशी बाजू भांगडिया यांनी मांडली आहे.

वडेट्टीवारांचं काय आहे म्हणणं?

- Advertisement -

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पासपोर्ट काढण्यासाठीच्या अर्जामध्ये मनोरा आमदार निवासाचा पत्ता देण्यात आला होता. त्यासाठी तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकाचं ना हरकत प्रमाणपत्र देखील जोडण्यात आलं होतं. या प्रमाणपत्रामध्ये वडेट्टीवार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं देखील नमूद करण्यात आलं होतं. मात्र, यावरच भांगडियांनी आक्षेप घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी आपली बाजू मांडली आहे. ‘हा सर्व प्रकार म्हणजे माझ्याविरोधातलं राजकीय षडयंत्र आहे. माझ्यावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल नाही. दाखल असलेले गुन्हे हे किरकोळ राजकीय आहेत’, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

- Advertisement -