घरमहाराष्ट्रविजयसिंह मोहिते-पाटील, तानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळ प्रवेश निश्चित

विजयसिंह मोहिते-पाटील, तानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळ प्रवेश निश्चित

Subscribe
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित झाला असून १४ जून रोजी नवीन मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, शिवसेनेचे उपनेते आ. तानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळ प्रवेश निश्चित मानला जात आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यास अजून दोन मंत्रीपदे मिळणार आहेत.
मंत्रीमंडळ विस्तारात भाजपा व शिवसेनेच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा समावेश होणार आहे. लोकसभेपुर्वी भाजपाच्या जवळ आलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळे भाजपाचा मोठा फायदा झाला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयात मोहिते-पाटील यांचा सिहाचा वाटा आहे.
तसेच त्यांचा प्रभाव सोलापूर, मावळ, बारामती या मतदारसंघावर देखील पडला. राज्याच्या मंत्रीमंडळात अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केलेले मोहिते- पाटील हे प्रभावी व अनुभवी नेते समजले जात असून त्यांच्या माध्यमातून बारामतीकरांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -