घरमहाराष्ट्र'माढासाठी विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं होतं'

‘माढासाठी विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं होतं’

Subscribe

माढा लोकसभेची उमेदवारी ही विजयसिंह मोहिते पाटील यांनाच दिली जाणार होती. त्यांच्या नावावर खुद्द पवारसाहेबांनी शिक्कामोर्तब केले होते, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

माढा लोकसभेची उमेदवारी ही विजयसिंह मोहिते पाटील यांनाच दिली जाणार होती. त्यांच्या नावावर खुद्द पवारसाहेबांनी शिक्कामोर्तब केले होते आणि तसे त्यांना कळवण्यातही आले होते, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. त्यावर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे.

काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष

गेली अनेक वर्षे विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. राज्याच्या मंत्रीपदावर त्यांनी काम केले आहे. उपमुख्यमंत्रीपदही भूषविले होते. शिवाय खासदारही होते. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हेही खासदार होते. आज विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्ष उमेदवारी देणार होता. परंतु त्यांनी दुसरं नाव दिलं होतं परंतु त्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात चर्चा करणार होतो. आजही राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज पक्ष सोडला. त्यांच्याविषयी वेगळं आणि वाईट बोलणं योग्य नाही, असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. माढा मतदारसंघात आम्ही निष्कर्षापर्यंत आलो आहोत की, आम्ही सक्षम उमेदवार देवू. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा माढा जिंकण्याचा भ्रम तुटेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

माढातील ताकदीवर परिणाम नाही

निवडणूका येतात त्यावेळी अनेक प्रश्न असतात. सत्ता असली त्याजवळ जाणारे असतातच. कच्चे दुवे सत्ताधारी साधत असतात असे सांगतानाच माढातील ताकदीवर कोणताही परिणाम होणार नाही अशी स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -