CCTV Video : पुण्यात मनोरुग्ण महिलेचा राडा; पोलीस, लष्कराला घातल्या शिव्या

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड भागामध्ये एका मनोरुग्ण महिलेने पोलिसांसमोर चांगलाच हैदोस घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pune
pune woman chaos

दारूच्या नशेत व्यक्ती काय करेल, याचा काही नेम नाही. पण त्याहीपुढे जाऊन दारू प्यायलेली व्यक्ती जर मनोरुग्ण असेल, तर मात्र सगळाच राडा होण्याची शक्यता असते. तसाच राडा पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात मंगळवारी पहाटे झाला. स्वाती मिश्रा या महिलेने तिच्या डस्टर कारने त्याच परिसरात उभ्या असलेल्या नॅनो कारला जोरदार धडक दिली. आणि एकदा-दोनदा नव्हे, तर तब्बल ८ वेळा तिने नॅनो कारला धडक दिली. यामुळे नॅनो कारचे आणि तिच्या डस्टर कारचे देखील नुकसान झाले. या प्रकरणी नॅनो कारचे मालक २८ वर्षीय दर्श सुभाष चावला यांनी हिंजवडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मध्यरात्री घातलेला हैदोस पुरेसा नव्हता, म्हणून या महिलेने सकाळी पोलीस चौकशी करण्यासाठी आले असताना तिच्या घरासमोरच राडा घातला. एवढंच नाही, तर पोलीस आणि लष्कराला देखील तिने शिव्या घातल्या. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.

मंगळवारी पहाटे काय झालं?

मंगळवारी पहाटे स्वाती मिश्रा दारूच्या नशेत तिच्या डस्टर (MH12 KT 1736) गाडीतून विहार सोसायटी परिसरात आली. यावेळी ती दारूच्या नशेत होती असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. यावेळी स्वातीने तिथे उभ्या असलेल्या दर्श चावलाच्या नॅनो कारला धडका मारण्यास सुरुवात केली. तब्बल ८ वेळा तिने नॅनो कारला धडक मारली. यावेळी आसपासच्या घरांमधून नागरिक बाहेर देखील आले. मात्र, त्यांच्यापैकी कुणीही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळी स्वाती यांनी आसपासच्या सोसायटीधारकांना देखील शिवीगाळ केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकारावर दर्श चावला यांनी पोलिसांत तक्रार केली. यावर स्वातीची चौकशी करण्यासाठी पोलीस आले असता स्वातीने थेट तिच्या घरासमोरच गोंधळ घालायला सुरुवात केली.

पुण्यात मद्यधुंद महिलेने नॅनो गाडीला धडक देत पोलिसांसोबत केली अरेरावी

CCTV: पुण्यात मनोरुग्ण महिलेचा तमाशा; नॅनो गाडीचा चुराडा केल्यानंतर पोलिसांशीही केली अरेरावी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 21, 2019

स्वाती मनोरुग्ण असल्याचा दावा!

स्वातीने या पोलिसांना थेट उडवून लावलं. तसेच, त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत वाद घालायला सुरुवात केली. थेट पोलिसांना आणि लष्कराला देखील शिवीगाळ करण्यापर्यंत तिची मजल गेली. यावेळी तिने ‘आत्तापर्यंत गाड्या उडवल्या, उद्या मी लोकांनाही उडवीन’, अशी थेट धमकीच दिली आहे. तिच्या पतीशी पोलिसांनी चर्चा केली असता ती मनोरुग्ण असल्याचा दावा तिच्या पतीने केला. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून नुकताच एका झोमॅटो गर्लचा गोंधळ आणि शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झालेला असताना आता हा नवीन व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे.