घरमहाराष्ट्रपंढरपूरच्या विठ्ठलाला सोन्याचा चंद्रहार अर्पण

पंढरपूरच्या विठ्ठलाला सोन्याचा चंद्रहार अर्पण

Subscribe

पंढरपूरच्या विठ्ठलासाठी एक भक्ताने तब्बल ३४ लाख रुपयांचा सोन्याचा चंद्रहार बनवला आहे. हा चंद्रहार त्या भक्ताने विठ्ठलाला अर्पण केला आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलासाठी एक भक्ताने तब्बल ३४ लाख रुपयांचा सोन्याचा चंद्रहार बनवला आहे. हा चंद्रहार त्या भक्ताने विठ्ठलाला अर्पण केला आहे. कानडा भक्‍ताने तब्बल ३४ लाख रुपयांचा ६३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केल्याची माहिती समोर येत आहे. ही गेल्या काही वर्षांत ही श्री विठ्ठलाला आलेली सर्वाधिक किंमती देणगी असून हा सुरेख चंद्रहार शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी विठ्ठलाच्या गळ्यात वाहण्यात आला आहे.

कर्नाटकच्या भक्ताने केला हार अर्पण

देशभरात श्री विठ्ठलाचे भक्‍त पाहायला मिळतात. परंतू, प्रामुख्याने श्री विठ्ठल हा कानडी असल्याचा उल्लेख होतो. त्यातूनच संतांनी कानडा विठ्ठल असल्याचा गौरव केला आहे. कार्तिकी यात्रेसाठी येणार्‍या वारकर्‍यांमध्ये सर्वाधिक संख्या ही कानडी भक्‍तांची असते. याच कर्नाटकातील बंगळूरूच्या एन.जी. राघवेंद्रराव आणि विपीन जलानी यांनी ६३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे. या हाराची किंमत २५ लाख रुपये आहे मात्र जीएसटीसह हाराची किंमत ३४ लाख रुपये झाल्याचे राव यांनी सांगितले.

- Advertisement -

सर्वाधिक किमतीचा चढावा

राघवेंद्रराव हे काही महिन्यांपूर्वी विठ्ठल दर्शनाकरता पंढरीला आले होते. त्यावेळी देवास चंद्रहार अर्पण करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर या चंद्रहाराची निर्मिती करून घेतली. शुक्रवारी हा चंद्रहार विठ्ठलास अर्पण करण्यात आला. यावेळी राघवेंद्र राव, विपीन जलानी यांच्यासह त्यांचे नातेवाईकही उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने हार स्वीकारून देवाच्या गळ्यात वाहण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे अधिकारी, सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -