२०१४ ला हातकणंगले तर यंदा कोल्हापूरमध्ये झाले सर्वाधिक मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान देशभरासह राज्यादेखील पार पडले असून राज्यातील १४ मतदार संघांमध्ये अंदाजे ६१.३० टक्के मतदान झाले असून २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६२.८८ टक्के मतदान झाले होते.

Mumbai
Employees should pay leave for voting
मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान देशभरासह राज्यादेखील पार पडले असून राज्यातील १४ मतदार संघांमध्ये आज, २३ एप्रिल रोजी मतदान झाले. या मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ६१.३० टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. मात्र साडेसहा वाजेपर्यंत मिळालेल्या टक्केवारीनुसार गेल्या वेळच्या म्हणजेत २०१४ च्या निवडणुकीपेक्षा अर्धा टक्का मतदान कमीच झाल्याचे पाहायला मिळाले. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या १४ मतदार संघात ६२.८८ टक्के मतदान झाले होते. यंदा या १४ मतदार संघांपैकी कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ६९ टक्के मतदान झाले असून २०१४ साली मात्र हातकणंगलेमध्ये सर्वाधिक ७३ टक्के मतदान झाले होते.

दिग्गज नेत्यांसाठी झाले मतदान 

आज झालेल्या १४ मतदार संघात एकूण २४९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर २८ हजार ६९१ मतदान केंद्रांपैकी ३ हजार ८२५ मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले. १ लाख ५४ हजार कर्मचारी या मतदान केंद्रांवर कार्यरत होते. तिसऱ्या टप्प्यामध्ये मैदानात असलेली मोठी नावं म्हणजे सुप्रिया सुळे (बारामती), सुजय विखे पाटील (अहमदनगर), माढा (रणजितसिंह नाईक निंबाळकर), अनंत गीते (रायगड), रावसाहेब दानवे (जालना), गिरीश बापट (पुणे), उदयनराजे भोसले (सातारा), विनायक राऊत (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), राजू शेट्टी (हातकणंगले) यांचं भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित मतदान

 1. जळगाव ५८ टक्के
 2. रावेर ५८ टक्के
 3. जालना ६३ टक्के
 4. औरंगाबाद ६१.८७ टक्के
 5. रायगड ५८.०६ टक्के
 6. पुणे ५३ टक्के
 7. बारामती ५९.५० टक्के
 8. अहमदनगर ६३ टक्के
 9. माढा ६३ टक्के
 10. सांगली ६४ टक्के
 11. सातारा ५७.०६ टक्के
 12. रत्नागिरी-सिंधुदुर्ग ६२.२६ टक्के
 13. कोल्हापूर ६९ टक्के
 14. हातकणंगले ६८.५० टक्के