घरमहाराष्ट्रपावसामुळे पंढरीत हाहाकार; चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू

पावसामुळे पंढरीत हाहाकार; चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू

Subscribe

चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत दुपारी अडीच वाजता कोसळली.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राकडे येत असून १६ ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या चार दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंढरीत हाहाकार उडाला आहे. चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत दुपारी अडीच वाजता कोसळली. या घटनेत ६ जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे या भिंतीच्या आडोशाला काही लोक उभे असल्याने काही लोकं या ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता आहे. तर काठावर भीक मागणारे भिकारी या भिंतीच्या आडोशाला होते.

- Advertisement -

दरम्यान, भिंत कोसळल्याने त्याचा मोठा आक्रोश सुरू आहे. तर अद्याप ढिगाऱ्याखाली किती लोक दाबले गेले हे नेमके सांगितले गेले नाही. तसेच चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळल्याने येथे मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

येत्या चार दिवसात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राकडे येत असून १६ ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या चार दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी १५ आणि १६ तारखेला मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १४ तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीची अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.


येत्या चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -