घरमहाराष्ट्रसंगमनेरमध्ये आरक्षणासाठी वंजारी समाजाचा मोर्चा

संगमनेरमध्ये आरक्षणासाठी वंजारी समाजाचा मोर्चा

Subscribe

संगमनेरमध्ये आरक्षणासाठी वंजारी समाजाने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

मराठा आणि धनगर समाजाच्या पाठोपाठ आता वंजारी समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वंजारी समाज संगमनेर तालुक्यात हजारोंच्या संख्येने एकवटले आहेत. आरक्षणासाठी वंजारी समाजाने संगमनेरमध्ये भव्य मोर्चा काढला. हा मोर्चा संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकला आहे. या मोर्चेत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थींनी, महिला, तरुण, पौढ सर्व मोठ्या संख्येने सामील झाले आहेत. आंदोलकांनी हातात भगवे झेंडे धरले आहेत.

काय आहेत वंजारी समाजाच्या मागण्या?

  • १० टक्के वाढीव आरक्षण मिळावे
  • जातीनिहाय जनगनना करावी
  • स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळ स्थापन करा
  • वंजारी समाजासाठी जिल्हानिहाय वस्तीगृह चालू करा
  • उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज द्या
  • नोकरभरतीत आरक्षण वाढवा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -