मुलीच्या प्रेमात तो झाला पोलिसांच्या जाळ्यात ‘कॅप्चर’

गर्लफ्रेंडच्या हौशीमौजी पुरवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी २७ लाखांचे कॅमेरे भाड्यांने घेऊन ते कॅमेरे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune
Want to keep girlfriend happy, 29 lakhs of cameras seized

प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचीच प्रचीत पुण्यात पाहायला मिळाली आहे. पुण्यात एका तरुणाने प्रियसीचे लाड पुरवण्यासाठी चक्क स्वत:च्या व्यवसायाचा गैरफायदा घेतल्याची घटना उघडकीस आले आहे. आकाश पांडुरंग भिसे (२२) असे या तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांना अटक करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील आकाश भिसे हा एक व्यावसायिक फोटोग्राफर आहे. या तरुणाचे चार महिन्यांपूर्वी एका तरुणीशी ओळख झाली. या मैत्रीचे रुपांतर काही दिवसांनी प्रेमात झाले. आकाश हा प्रेयसीचे लाड पुवण्यासाठी महागडे कॅमेरे भाड्याने घेऊन ते गहाण ठेऊन तो पैसे मिळवायचा. आकाश शहरातील वेगवेगळ्या फोटो स्टुडिओमध्ये जाऊन त्याला फोटोग्राफीच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या असून त्यासाठी कॅमेरा भाड्याने पाहिजे असे तो सांगायचा. प्रत्येक दिवसाला दीड हजार रुपये याप्रमाणे महागडे कॅमेरे भाड्याने घ्याचा आणि हेच कॅमेरे तो गहाण ठेवायचा. या मिळालेल्या पैशातून त्यांनी प्रेयसीला अॅक्टीव्हा गाडी, सोन्याच्या अंगठ्या आणि चैन घेऊन दिली होती. तसेच तो प्रेयसीला आणि मित्रांना महागड्या हॉटेलमध्ये देखील घेऊन जायचा. अशाप्रकारे मौजमजेसाठी त्यांनी ही शक्कल लढवल्याचे उघड झाले आहे.

असे उघडकीस आले प्रकरण

आकाश या तरुणाने आपल्याला फोटोग्राफी करण्यासाठी कॅमेरा भाड्याने हवा असल्याचे सांगत त्यांनी १० कॅमेरे भाड्याने घेतले होते. पुण्यातील लक्ष्मी रोड परिसरात फरासखान पोलीस गस्त घालत असताना त्यांना एक तरुण महागडा कॅमेरा घेऊन थांबलेला असताना आढळला. आकाश या तरुणाकडे चौकशी केली असता तो कॅमेरा चोरीचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी करत त्याकडून तब्बल २६ लाख ६० हजार रुपयाचे १० कॅमेरे आणि ८ लेन्स जप्त केले आहेत. याप्रकरणी आकाश पांडुरंग भिसे या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here