नाशिकमध्ये प्रभागनिहाय भाजीबाजार; कॉलन्यांमध्येही हातगाडीवाल्यांना परवानगी

महापालिका प्रशासनाचे नियोजन; लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न लॉकडाऊनच्या काळात नाशिककरांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने प्रभागनिहाय भाजीबाजाराची ठिकाणे निश्चित केली आहे. या ठिकाणांची यादीच पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. याशिवाय हातगाडीवर भाजीपाला विकणार्‍यांना विविध कॉलन्या, भाजी बाजार नसेल अशा वस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजीपाल्याची विक्री करण्यासही महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी परवानगी दिली आहे. .

Nashik

लॉकडाऊनच्या काळात नाशिककरांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने प्रभागनिहाय भाजीबाजाराची ठिकाणे निश्चित केली आहे. या ठिकाणांची यादीच पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. याशिवाय हातगाडीवर भाजीपाला विकणार्‍यांना विविध कॉलन्या, भाजी बाजार नसेल अशा वस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजीपाल्याची विक्री करण्यासही महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी परवानगी दिली आहे.

फळे, भाजीपाला, मटन, चिकन व मच्छी विक्रेते यांचे नियोजन-

 • भाजीबाजारासाठी परवानगी – सकाळी ८ ते दुपारी १२ तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८
 • महापालिकेचे दोन कर्मचारी ठेवणार देखरेख
 • एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याची जबाबदारी संबंधित कर्मचार्‍यांची असेल
 • दररोज संबंधित ठिकाण निर्जूंतूक करण्यात येईल
 • दोन व्यक्तींमध्ये किमान पाच फूट अंतर असेल अशी व्यवस्था
 • भाजी विक्रेत्यांना मास्क व हातमोजे वापरण्याची सक्ती अन्यत्र अनधिकृतरित्या भाजीबाजार बसणार नाही याची जबाबदारी विभागीय अधिकार्‍यांची असेल

भाजी विक्रेते आणि अन्य दुकानांदारांसाठी अशी असेल आचारसंहिता : 

 • भाजी विक्रेते फेरीवाले, किराणा, मेडीकल, दुधविक्रेते, पिठाची गिरणी, पशुखाद्य, दवाखाने, दुकाने आदी ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी दुकानदाराने घेणे गरजेचे आहे
 • दोन व्यक्तींमधील अंतर किमान ५ फूटापर्यंत असावे
 • विक्रेता आणि ग्राहकांतील अंतरही ५ फूटांपर्यंत असावे
 • दोन दुकानांमधील अंतर १०० फूट इतके असावे
 • महापालिकेच्या भाजीमार्केटमधील ओट्याच्या ठिकाणी प्रत्येकी तीन ओट्यांमधील मधला ओटा रिकामा असावा
 • दुकानांबाहेर पांढर्‍या रंगाने आखणी करण्याचा नमूना पत्राव्दारे दुकानदारांना पाठवावा
 • ज्या दुकानांमध्ये गर्दी होते अशा दुकानदारांनी गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी
 • किराणा, औषधे व तत्सम आवश्यक सेवा पुरवणार्‍यांनी मोबाइलवर ऑर्डर स्विकाराव्यात
 • ऑर्डरनुसार वस्तू पॅक झाल्यानंतर ग्राहकाला फोन करुन दुकानदाराने बोलवावे
 • प्रत्येक दुकानांत ग्राहकांसाठी सॅनेटायझर ठेवण्याच्या सूचना

प्रभागनिहाय भाजी बाजाराची ठिकाणे अशी-

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here