घरमहाराष्ट्रवाशिमच्या तरूणाचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणतो 'पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या'

वाशिमच्या तरूणाचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणतो ‘पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या’

Subscribe

भन्नाट मागणीचे गजाननचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

वाशिममधील तरूण गजानन राठोड याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं पत्र सध्या जोरदार चर्चेत आहेत. या पत्राद्वारे त्याने मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या तरुणाने मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात गजानन राठोड याने असे म्हटले की, ‘माझं वय ३५ वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण गेल्या ७ वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु, कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते. तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण झाले आहे,’ अशी खंत या वाशिमच्या तरूणाने या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.’एकतर मला जॉब द्या, अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करून द्यावे’, अशा भन्नाट मागणीचे गजाननचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असे लिहिले पत्रात…

”माझे सध्या वय ३५ वर्ष झाले असून आजपर्यंत माझे लग्न झालेले नाही. त्याचे कारण असे की मी मागील सात वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु काही ना काही कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे त्यांची एकच मागणी असते की मुलगा जॉबवर पाहिजे, असे गजाननने लिहिले आहे.

आपण अजून कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण आहे. आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, ही नम्र विनंती”

- Advertisement -

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेकांनी पत्राद्वारे आपली व्यथा सांगितली आहे. महाराष्ट्रातील जनतेने लिहिलेली पत्र लक्षवेधी ठरली आहेत. य़ामध्ये दोन वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील एका तरूणाने राज्यपालांना थेट पत्र लिहिले होते. मराठवाड्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, अशी मागणी या तरुणाने आपल्या पत्रात केली होती. कधी चिमुरड्यांनी आपल्या वडिलांना कुटुंबासाठी वेळ देता यावा, म्हणून घातलेली साद डोळ्यात पाणी आणतात, तर काही जणांच्या अजब मागण्या पोटधरून हसायला लावतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -