घरमहाराष्ट्रकरोनाने घेरलेली मुंबई पाणी संकटाच्या तोंडी

करोनाने घेरलेली मुंबई पाणी संकटाच्या तोंडी

Subscribe

करोनाच्या संकटाने घेरलेल्या मुंबईला लवकरच पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. जून महिन्यातील सरासरी पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने नोंदवली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलाव क्षेत्रांमध्ये अद्यापही पावसाची पुरेशा प्रमाणात हजेरी लावलेली नाही. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी घटत चालली आहे. सध्या या सर्व धरणांमध्ये १ लाख २४ हजार दशलक्ष लिटर अर्थात १२ हजार ४०२ कोटी लिटर एवढाच पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील ३० दिवसांचा साठा उपलब्ध असून हा साठा ३० जुलैपर्यंत पुरणारा आहे. त्यामुळे जुलै महिन्यात तलाव क्षेत्रात मुसळधार पावसाची बरसात होऊन पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्यास मुंबईसमोर ऐन पावसाळ्यात पाण्याची तीव्र समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी आदी तलाव तसेच धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची तहान भागवण्यासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा अपेक्षित असतो. या एकूण पाणी साठ्याच्या तुलनेत २९ जून २०२० ला या सर्व तलावांमध्ये एकूण पाणी साठा १ लाख २४ हजार २३ दशलक्ष लिटर एवढाच शिल्लक आहे.

- Advertisement -

मुंबईला सर्वाधिक पाण्याचा पुरवठा भातसा धरणातून होते. या धरणातील एकूण पाण्याची क्षमता ७ लाख १७ हजार ३७ दशलक्ष लिटर एवढी आहे. पण या धरणात सध्या ५२ हजार ५६७ दशलक्ष लिटर एवढाच पाणी साठा आहे. तर अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा अर्थात बाळासाहेब ठाकरे धरण आदींमध्ये एकूण ६ लाख ९४ हजार ५८२ दशलक्ष लिटर एवढा एकूण जलसाठा असून सध्या या सर्व तलाव आणि धरणांमध्ये ६३ हजार २३३ दशलक्ष लिटर एवढाच जलसाठा उपलब्ध आहे.

धरण/तलाव—– पाण्याची पातळी—— कमीत कमी पातळी—- आजची पातळी—एकूण पाऊस

- Advertisement -

——– ——-(मीटरमध्ये)——— (मीटरमध्ये)——- (मीटरमध्ये)——(मि.मी.मध्ये)

अप्पर वैतरणा——६०३.५१———-५९५.४४———–५९४.९४———- २७८.००

मोडक सागर——-१६३.१५———१४३.२६————१४८.५७———-२४३.००

तानसा———१२८.६३———११८.८७————-१२०.१८———–२५५.००

मध्य वैतरणा—-२८५.००———२२०.००————२४०.७२————३२८.००

भातसा——–१४२.००——– १४०.९०————१०८.९६————३३६.००

विहार———८०.१२——–७३.९२————–७५.४६————–३३३.००

तुळशी——१३९.१७——– १३१.०७————१३४.१७————-३२५.००

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -