घरमहाराष्ट्रपुण्यात पाणीकपात सुरु ; शहराला प्रतिदिन ११५० दशलक्ष लीटर पाणी

पुण्यात पाणीकपात सुरु ; शहराला प्रतिदिन ११५० दशलक्ष लीटर पाणी

Subscribe

पर्वती ते लष्कर जलकेंद्राअंतर्गत बंद जलवाहिनीचे काम अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे प्रतिदिन १५० दशलक्ष लीटर पाणी बचत तूर्त होणार नाही. त्यामुळे पाणीनियोजनाची महापालिकेची कसोटी पुढील आठवडय़ापासून सुरू होणार आहे.

पुणे शहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे शहराची लोकसंख्या गृहीत धरून प्रतिदिन ११५० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी देण्याची तयारी जलसंपदा विभागाने सुरू केली आहे. त्यातच पर्वती ते लष्कर जलकेंद्राअंतर्गत बंद जलवाहिनीचे काम अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे प्रतिदिन १५० दशलक्ष लीटर पाणी बचत तूर्त होणार नाही. त्यामुळे पाणीनियोजनाची महापालिकेची कसोटी पुढील आठवडय़ापासून सुरू होणार आहे.

हेही वाचा – शहराला २४ तास पाणी उपलब्ध करून देणारे गेले कुठे ?

- Advertisement -

म्हणून पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला

जलसंपदा विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या पाण्यातच महापालिकेला सुधारित वेळापत्रकानुसार किमान पाच तास पाणीपुरवठा करावा लागणार असून पुढील आठवडय़ापासून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा कमी असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शहरात दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिदिन १३५० दशलक्ष लीटर पाणी घेण्यात येत होते. मात्र त्यामध्ये कपात करून प्रतिदिन ११५० दशलक्ष लीटर पाणी महापालिकेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटताना दिसत आहे.


हेही वाचा – मुंबईसाठी आणखी ६७ हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -