घरताज्या घडामोडीइंदुरीकर महाराजांनी तसं म्हणायला नको होतं, पण... - चंद्रकांत पाटील

इंदुरीकर महाराजांनी तसं म्हणायला नको होतं, पण… – चंद्रकांत पाटील

Subscribe

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंदोरीकर महाराजांना दिला पाठिंबा

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी जे विधान केले, ते चुकीचे असून आम्ही त्याचे समर्थन करत नाहीत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मात्र या विधानाला समर्थन नसल्याचे सांगतानाच इंदोरीकर महाराजांना मात्र पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. “इंदुरीकर महाराज यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य करायला नको होते, पण चुकून कधीतरी असे वाक्य निघून जाते. याचा अर्थ इंदुरीकर महाराजांचे समाज प्रबोधनाचे काम नाकारता येणार नाही.”, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी विविध विषयावर भाष्य केले. इंदोरीकर महाराज यांच्याविषयी बोलताना त्यांनी माध्यमांना विनंती केली की, एका वक्तव्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या तपर्श्चयेची राख-रांगोळी नका करु. गेल्या अनके वर्षांपासून इंदोरीकर महाराज सातत्याने समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. एका महिन्यात ८० हून अधिक कीर्तने ते घेतात. त्यामुळे त्यांचे हे कार्य विसरता येणार नाही.

- Advertisement -

सारथीला पारथी करा

आम्ही सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना मदत करण्याचे काम केले होते. राज्य सरकारने आमचे सर्व निर्णय एका ओळीत रद्द करावेत, पण त्यांना पर्याय द्यावा. सारथी संस्थेचे नाव आवडत नसेल तर पारथी करा, पण योजना सुरु ठेवा, असे आवाहन चंद्राकांत पाटील यांनी केले. तसेच मराठवाडा ग्रीडचीही योजना गुंडाळणार असल्याचे कळत आहे. त्याचेही नाव बदलून मराठवाडा ब्रीड करायचे असेल तर करावे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -