घरमहाराष्ट्र'राज्यातल्या ४८ जागा आम्हीच जिंकणार'

‘राज्यातल्या ४८ जागा आम्हीच जिंकणार’

Subscribe

राज्यातील सर्वच जागा आम्हीच जिंकणार आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

राजातल्या ४८ पैकी ४७ जागांवर उमेदवार उभ्या करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता येणार नसल्याचा अंदाज राज्यातल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. मात्र, यावर प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीवरचा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सर्वच्या सर्व ४८ जागा वंचित बहुजन आघाडी जिंकू शकते, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यावेळी त्यांनी एक्झिट पोलवर भाष्य करणे टाळले असून ज्यांना एक्झिट पोल द्यायचे होते ते त्यांनी दिले आहेत. ते आकडे खरे की खोटे हे निकालानंतर स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले आहे. २३ तारखेपर्यंत सर्वांनी थांबले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. याआधी अकोल्यात बोलताना मतदानोत्तर चाचणीमध्ये काहीही दाखवत असले, तरी २३ तारखेचा निकाल आपल्याच बाजूने असल्याचा दावा वंचित प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

विजय आमचाच

प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमातून कार्यकर्त्यांना धीर दिला आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचे दाखवण्यात येत आहे. शिवाय स्वत: अॅड. प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूरमधून विजयी होऊ शकणार नाही, असा अंदाच मतदानोत्तर चाचणीत वर्तवण्यात आला. या पार्श्वभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे की, मतदानोत्तर चाचणी काही असली तरी आम्हीच ४८ जागा जिंकू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

ईव्हीएम हॅकिंग करणे कठीण नाही

सध्याची टेकनॉलोजी पुढे गेली आहे. त्यामुळे कोणतंही इलेक्ट्रॉनिक यंत्र हॅक होऊ शकते, असे कोणतेही यंत्र नाही जे हँकिंग होऊ शकत नाही. त्याप्रमाणे ईव्हीएम हॅकिंग करणे देखील कठीण नाही. फक्त ते कसे हॅक करतात ते शिकले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. निवडणुकीत पराभव झाल्यास कोणाला जबाबदार ठरवले जाईल, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘आम्ही कोणा एकावर खापर फोडणार नाही. आत्मपरिक्षण करुन लोकांसमोर मांडू‘, असे देखील ते म्हणाले आहे.


वाचा – प्रकाश आंबेडकरांना ० जागा! एक्झिट पोलचा अंदाज

- Advertisement -

वाचा – शरद पवार नाही तर ‘ही’ व्यक्ती व्हावी पंतप्रधान – प्रकाश आंबेडकर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -