घरताज्या घडामोडीशनिवारी अतिवृष्टी होणार, मुंबईसह सहा राज्यात रेड अलर्ट!

शनिवारी अतिवृष्टी होणार, मुंबईसह सहा राज्यात रेड अलर्ट!

Subscribe

पावसाने शुक्रवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. मात्र आता शनिवारी कोकणासह महाराष्ट्राच्या ६ जिल्हांमध्ये वेधशाळेने रेड अलर्ट जाहीर केला आहे.

मुंबई,ठाणे, पालघर,रायगड,पुणे आणि नाशिक या सहा जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने शनिवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या ४८ तासात कोकण गोव्यासह पश्चिम भागात मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. तर पुणे आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने शुक्रवारीसुद्धा मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला होता. आता शनिवारसाठी मात्र याहून अधिक पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घरातच थांबावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.


हे ही वाचा – अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -