घरमहाराष्ट्रखोदकाम करताना विहिरीचा काहीभाग कोसळून मजूराचा मृत्यू

खोदकाम करताना विहिरीचा काहीभाग कोसळून मजूराचा मृत्यू

Subscribe

कोल्हारवाडी येथे विहरीचे काम करताना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. एनडीआरएफच्या टीमने मजूराचा मृतदेह बाहेर काढला

पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये विहरिचे खोदकाम सुरु असताना विहिरीचा काही भाग अंगावर कोसळून मजूराचा मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी गणेशनगरमधील ही घटना आहे. विहरीचे खोदकाम करत असताना विहरीचा वरचा भाग मजूराच्या अंगावर कोसळला. त्या ढिगाऱ्याखाली अडकून किसन गावडे या मजूराचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये नव्याने विहिरी आणि जुन्या विहिरींची खोली करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोल्हारवाडी येथे विहरीचे काम करताना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. विहरीचा भाग कोसळल्याने किसन गावडे हे ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न यशस्वी न ठरल्यामुळे शेवटी त्यांनी एनडीआरएफला ही माहिती दिली.

एनडीआरएफच्या जवानांनी कोल्हारवाडी गावात धाव घेत रात्रभर बचावकार्य केले. मात्र विहरीचे खोलीकरण जास्त असल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. शेवटी विहरीतील ढिगारा हटवण्यात आला. मात्र तोपर्यंत किसन गावडे या मजूराचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कोल्हारवाडी गावामध्ये शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -