घरट्रेंडिंगतुमचा व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन असा आहे का? याने मेंबर्सला पार्टी दिली की...

तुमचा व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन असा आहे का? याने मेंबर्सला पार्टी दिली की राव!

Subscribe

ग्रुप अॅडमिनकडून पार्टी उकळणं सबके बसकी बात नाही! पण या पठ्ठ्यांनी हे करून दाखवलंय!

आपल्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवरचे सर्व सदस्य हे अॅडमिनकडून पार्टी मागण्यासाठी आणि ग्रुप अॅडमिन सदस्यांना कायम पार्टीसाठी झुलवत ठेवण्यासाठीच असतात की काय? असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला किमान एकदा तरी पडत असतो. बरं या ग्रुप अॅडमिनकडे सदस्य कोणत्याही कारणासाठी पार्टी मागू शकतात. आणि ग्रुप अॅडमिन देखील कोणतंही कारण सांगून ही पार्टी नाकारू किंवा पुढे ढकलू शकतो. पण आजतागायत ग्रुप अॅडमिनने ग्रुपमधल्या सदस्यांना त्यांच्या परफॉर्मन्सची दखल घेऊन पार्टी दिल्याचं ऐकिवात नाही. पण आता हे ऐकू येणार आहे. कारण बुलडाण्यामधल्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनने अॅडमिन पदाबद्दल असलेल्या सर्व समजुतींना तडा देत चक्क ग्रुपमधल्या सदस्यांना पार्टी दिली आहे! आणि तीही साधीसुधी पार्टी नाही..चक्क जेवणाचा बेत आखला! टीव्ही ९ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सदस्यांनी मारला केक आणि जेवणावर ताव!

‘अॅ़डमिनसाहेब पार्टी कधी?’ असं विचारणारे असंख्य सदस्य आपल्या ग्रुपमध्ये असतात. अशाच सदस्यांना खूश करत बुलडाण्याच्या चिखलीमध्ये एका अॅडमिनने ग्रुपला ६ वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सर्व सदस्यांना पार्टी दिली. ‘फक्त ९६’ असं या ग्रुपचं नाव असून त्याच्या ग्रुप अॅडमिनचं नाव आहे प्रमोद पाटील. प्रमोद पाटील यांनी सर्व ग्रुप सदस्यांना आपल्या घरी आमंत्रित करून त्यांना ज्वारीची भाकरी, उडीद डाळ, ठेचा आणि गोड शिरा असा जेवणाचा बेत करून पार्टी दिली. ग्रुपच्या षटकारानिमित्ताने केक देखील कापला! आता अॅडमिन इतका उदार झाल्यावर सदस्यांना भरून येणं साहजिकच आहे. या सर्व सदस्यांनी आपल्या ग्रुप अॅडमिनचे मनापासून आभार मानले. विशेष म्हणजे, या ग्रुपमधल्या अनेक सदस्यांनी एकमेकांना कधी पाहिले देखील नव्हते. या पार्टीच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती!

- Advertisement -

ग्रुप अॅडमिन असावा तर असा!

प्रमोद पाटील यांच्यामुळे ग्रुप अॅडमिन कधीच पार्टी देत नाही, या धारणेला चांगलंच उत्तर मिळालं आहे. शिवाय, आता असंख्य व्हॉट्सअॅप ग्रुपमधले सदस्य हक्काने आपल्या ग्रुप अॅडमिनकडे प्रमोद पाटलांचं उदाहरण देऊन पार्टी मागू शकतात. पण एक मात्र नक्की, आता सर्वच ग्रुपमधल्या सदस्यांना असं एकदा तरी वाटेल की आपला ग्रुप अॅडमिन सुद्धा प्रमोद पाटील यांच्यासारखा असावा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -