घरमहाराष्ट्रसाडेसहा हजार कोटी गेले कुठे?

साडेसहा हजार कोटी गेले कुठे?

Subscribe

राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडे सहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. मग ते साडेसहा हजार कोटी गेले कुठे ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी कल्याणात मुख्यमंत्र्यांना केला. यावेळी प्रेक्षकामधून ‘गाजर, गाजर’ असा एकच आवाज झाला.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार प्रकाश भोईर यांच्या प्रचारासाठी कल्याणातील वासुदेव बळवंत फडके मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कल्याणातील वाहतूक कोंडी, खड्डे या समस्येवरही राज ठाकरे यांनी ठाकरे शैलीत प्रहार करीत. खड्ड्यातून तुम्ही घरापर्यंत वाट कशी काढता, तुम्हालाच ठाऊक असेही ते म्हणाले.

- Advertisement -

या सरकारला छत्रपतींबद्दल काही आस्था नाही. समुद्रात पुतळा उभारणार होते. त्याचे काय झाले? विरोधी पक्ष विचारत नाही. मोदी-फडणवीस यांनी समुद्रात भूमीपूजन केले, ती जागा आता दाखवायला सांगितली तर यांना सांगता येणार नाही, अशी खिल्ली ठाकरे यांनी उडवली.

मनसेने अनेक आंदोलने केली. काही पत्रकार ही आंदोलने अर्ध्यातून का सोडली? असा प्रश्न विचारतात. पण एकही आंदोलन मी अर्ध्यात केलं नाही, असेही राज म्हणाले. माझ्या मनातील राग , चीड या भावनेतून ही आंदोलने झाली. मग तुमच्या मनात येणारी राग चीड तुम्ही का दाबून ठेवता? तुमचा राग, मोबाईलवर, सोशल मिडियावरच व्यक्त होतो. सरकारला जनतेची भीती असायला हवी. त्यासाठी मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन राज यांनी केले.

- Advertisement -

बाकीचे बंडखोरीने पोखरलेले, आपलं ठणठणीत
काही पक्षांना बंडखोरीने पोखरले, तर काहींनी राजीनामे दिले. पण आपण ठणठणीत आहोत, असा टोला राज यांनी नाव न घेता भाजप-सेनेला लगावला.

माझ्यावर 95 केसेस
कल्याणातील उत्तर भारतीयांच्या आंदोलनाची आठवण राज यांनी जागवली. कल्याणात मला अटक झाली. त्यावेळी माझ्यावर 95 केसेस दाखल केल्या. गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलन झाले. त्यावेळी 20 हजार लोकांना लाथ मारून हाकलण्यात आले, पण त्याच्या बातम्याही आल्या नाहीत, असेही राज म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -