घरलोकसभा २०१९तडका वादाचाबोलता येत असेल तरच बोला; नाहीतर काही खैर नाही - अजित पवार

बोलता येत असेल तरच बोला; नाहीतर काही खैर नाही – अजित पवार

Subscribe

‘निवडणूकीच्या प्रचारात बोलताना जर नीट बोलता येत नसेल तर बोलू नका. शिवसेना आणि भाजपचे वाचाळवीर ज्याप्रमाणे बोलत आहेत, त्यांच्याप्रमाणे आपल्याला बोलायचे नाही. मीडिया आणि सोशल मीडियाची नजर आपल्या भाषणावर असते, त्यामुळे तोलून, मापून, मोजून बोला. नाहीतर काही खैर नाही’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जयदिप कवाडे यांनी स्मृती इराणीवर केलेल्या भाष्याचा समाचार घेतला. तसेच त्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली.

बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज अर्ज भरण्यात आला. यावेळी पुणे येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. यावेळी अजित पवार यांनी सर्वांनाच सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. अजित पवार म्हणाले की, “कुंकू हे कुंकू असते त्याचा अपमान कुणीही करु नये. नाना पटोले यांच्या सभेत एका सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्याने कुंकवाचा अपमान करणारे वाक्य बोलले, त्याबद्दल मी स्वतः दिलगीरी व्यक्त करतो.”

- Advertisement -

काय म्हणाले होते कवाडे

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी नाना पटोले यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत स्मृती इराणींवर टीका केली होती. “संविधान बदलणे हे नवरा बदलण्याइतके सोपे नाही.” अशी वादग्रस्त टीका कवाडे यांनी केली होती. “स्मृती इराणी यांच्या कपाळावरील कुंकू दिवसेंदिवस मोठे होत चालले आहे. यावर कुणीतरी सांगितले की, नवरे जसे बदलत जातात, तसे त्यांचे कुंकू मोठे होत जाते.”, असेही कवाडे म्हणाले होते.

हे वाचा – किरीट सोमय्यांचा अखेर पत्ता कट; मनोज कोटक यांना उमेदवारी

- Advertisement -

या वक्तव्यानंतर नाना पटोले आणि जयदीप कवाडे यांच्यावर चहुबाजूंनी टीका व्हायला लागली होती. वृत्तवाहिन्यांनी देखील हे वक्तव्य वारंवार दाखवून टीका केली. त्यामुळे याचा परिणाम महाआघाडीवर होत असल्याचे दिसताच अजित पवार यांनी स्वतःच याप्रकरणी भाष्य करुन दिलगीरी व्यक्त करुन टाकली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -