जातीचं नाव काढणाऱ्याला ठोकून काढेन – गडकरी

'या समाजात गरीब श्रीमंत असता काम नये, कोणी छोट्या आणि मोठ्या जातीचा राहता कामा नये', अशी इच्छा नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली.

Mumbai
who ever do caste based politics i will bit him - nitin gadkari
केंद्रीय मंत्री - नितीन गडकरी (फाईल फोटो)

आज पिंपरी-चिंचवडमध्ये पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमतर्फे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीयवादावरुन तो पसरवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन, आमच्या पाच जिल्ह्यात जात काढत नाहीत. त्यामुळे जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक, सामाजिक समता-एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे’, असं प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं. याप्रसंगी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, माधव भंडारी गिरीश प्रभुणे, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, ‘सोशितांची, पीडितांची निरंतर सेवा केली पाहिजे आणि ज्या दिवशी त्यांना रोटी, कपडा, मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल, असा संदेश पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सामाजिक, आर्थिक आत्मचिंतनात मांडलेला आहे. त्यामुळे मी जात पात पाळत नाही.’

गडकरी म्हणाले, ‘आमच्या इथे एखाद्याची जात काढण्याचे प्रकार बंद झाले आहेत. कारण मी सर्वांना बजावलंच आहे की जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन.’ ‘या समाजात गरीब श्रीमंत असता काम नये, कोणी छोट्या आणि मोठ्या जातीचा राहता कामा नये. आपला समाज एकात्मता आणि अखंडतेच्या आधारावर तयार झाला पाहिजे’, असंही गडकरी यावेळी म्हणाले. ‘संपूर्ण समाजाचे संघटन हे जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त तसंच आर्थिक, सामाजिक समतेच्या आधारावर झाले पाहिजे’, असंही ते यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here