घरमहाराष्ट्रशहापुरात सेनेचे उमेदवार कोण बरोरा की दरोडा ?

शहापुरात सेनेचे उमेदवार कोण बरोरा की दरोडा ?

Subscribe

शिवसैनिक संभ्रमात ,गटबाजी चव्हाट्यावर येणार

राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाने सेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने दरोडा समर्थक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. शिवसेनेची उमेदवारी बरोरांना का दरोडांना मिळणार? याबाबत शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवसैनिक संभ्रमात सापडले आहेत.

बरोरांच्या सेना प्रवेशामुळे शिवसेनेत आता अंतर्गत धुसफूस सुरू झाली असून उघड उघड सेनेतील गटबाजी समोर येत आहे. शिवसेनेत दरोडांची राजकीय कोंडी करून त्यांना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याने दरोडा गट आक्रमक झाला आहे. जर दरोडांचा विधानसभेत पत्ता कट झाल्यास शिवसेनेत फूट पडणार आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी खुद्द दरोडांनी तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला असून समर्थकांची जुळवाजुळव केली जात आहे.

- Advertisement -

दुसरीकडे ‘मी केवळ शहापूरच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे.’ असे बरोरांकडून सांगितले जात आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत बरोरांना सेनेची उमेदवारी दिली जाईल, हे जवळ जवळ निश्चित झाले असताना

विधानसभेच्या तिकिटाचा मीच दावेदार असून मलाच उमेदवारी मिळेल, मी शिवसेनेतच आहे, कुठे जाणार नाही, असे दरोडांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत विधानसभेच्या तिकिटावरून वाद पेटणार असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -